सोलापुरात भाजपाकडून मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न
सोलापूर : ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मागणीसाठी आज बुधवारी राज्यभर भारतीय जनता पक्षाच्यावतीनं आंदोलन सुरु आहे. त्याचा एक भाग म्हणून सोलापूरातही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन झालं. ओबीसी राजकीय आरक्षण मिळण्यासाठी निष्काळजीपणा करणाऱ्या महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षांच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्ष शहर व जिल्ह्याच्या वतीने आक्रमक निदर्शने केली.
भाजपच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा आणून दहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीसांनी तो रोखला आणि पुतळा ताब्यातून काढून घेतला. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांत ओढाओढी झाली. काही कार्यकर्त्यांना पोलीसांनी तात्काळ ताब्यात घेतलं. या आधी आमदार विजय देशमुख, जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, शहराध्यक्ष विक्रम देशमुख, महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. उद्धव ठाकरे सरकार ओबीसींच आरक्षण जाण्यास कारणीभूत आहे, असा आरोप करण्यात आला. भाजपाचे विविध सेलचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
या आंदोलनावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी तो रोखला. या आंदोलनात आमदार विजयकुमार देशमुख, महापौर श्रीकांचना यन्नम, शहराध्यक्ष विक्रम देशमुख, जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, सभागृह नेते शिवानंद पाटील, झेडपी सदस्य अरुण तोडकर, आनंद तानवडे, बिज्जू प्रधाने, अमर पुदाले, शंकर वाघमारे, के के पाटील, शशिकांत चव्हाण, प्रणव परिचारक, यांच्यासह शहर जिल्ह्यातील पदाधिकारी नगरसेवक मोठ्या संख्येने सामील झाले होते.
राज्य सरकारच्या हलगर्जीपणामुळे पाच जिल्हा परिषदांमध्ये ओबीसींना वगळून निवडणुका हाेत आहेत. राज्य सरकारने सर्वाेच्च न्यायालयात वकील दिला असता तर ही वेळ आली नसती. सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी महाआघाडी सरकारने वकीलच दिला नाही, असा आराेप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. या आरोपावर उद्धव मुख्यमंत्री ठाकरे आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उत्तर द्यावे. गेली सहा महिने महाआघाडी सरकार ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाबाबत टोलवाटोलवी करत आहे. ओबीसी समाजाचा इम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी तातडीने कार्यवाही सुरू करा, अशी मागणी भाजपने करूनही दुर्लक्ष केल्याचा आरोप.
या आंदोलनामुळे शहर पोलिसांनी जिल्हा परिषदेचे पूनम गेटवर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. यावेळी महाविकास आघाडी सरकारविरोधात भाजपने जोरदार घोषणाबाजी केली.

Comments