अनगरकरांसह माढ्याच्या शिंदेंचा भाजपमध्ये प्रवेश; राष्ट्रवादीचा बालेकिल्ला हादरला
“अनगरकरांसह माढ्याच्या शिंदेंचा भाजपमध्ये प्रवेश; राष्ट्रवादीचा बालेकिल्ला हादरला!” | जया'भाऊ' सचिन'दादा' गेम चेंजर..!
मुंबई | जिल्ह्यातील माजी आमदार राजन पाटील, विक्रांत पाटील, अजिंक्यराणा पाटील, तसेच माजी आमदार यशवंत माने आणि माढा येथील माजी आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजीतसिंह शिंदे यांच्यासह त्यांचे बंधू यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
मुंबई येथील भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते प्रवेश करण्यात आला. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे व अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी उपस्थित होते.या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चा पारंपरिक बालेकिल्ला असलेला जिल्हा हादरला असून, आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांपूर्वी राजकीय समीकरणात मोठा बदल होण्याची चिन्हे आहेत.
राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे की —
“अनगरकरांनी कमळ हाती घेतल्याने सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील समीकरणं आता नव्याने लिहिली जाणार!” या सर्व प्रक्रियेमध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी हे गेम चेंजर ठरले आहेत.



Comments