किती गोड गोड बोलतीस ज्ञानदा गं

आजच्या इंटरनेटच्या जमान्यात कोण कधी चर्चेत येईल हे सांगता येत नाही. दुसऱ्या भाषेत याला ‘इंटनेट सेन्सेशन’ असं म्हणतात. असे अनेक इंटरनेट सेन्सेशन या देशात आहेत. कोरोनामुळं लॉकडाऊन झालं आणि लोक घरात अडकले, या काळात एक नाव घराघरात चर्चिलं जात होतं, ते म्हणजे एबीपी माझाची अँकर ज्ञानदा कदम…



ज्ञानदा कदम नवी इंटरनेट सेन्सेशन-

ज्ञानदा कदम प्रख्यात मराठी न्यूज चॅनेल एबीपी माझाची अँकर आहे. रोज बातम्या देताना लाखो लोक तिला पाहतात. सौंदर्यासोबत बुद्धीमत्तेचं वरदान लाभल्यानं तिचं अँकरिंग पाहण्यासारखं असतं. गेल्या अनेक वर्षांपासून ती हे काम करत असल्यानं घराघरात तिचं नाव माहित असलेले लोक आहेत. तिची बातम्या सादर करण्याची पद्धत अनेकांना आवडत आहे. लॉकडाऊनमध्ये लोक घरात बंद झाल्यानं अनेकांना रिकामा वेळ मिळाला आणि त्यांनी ज्ञानदा कदमला ट्रोल करण्यास सुरुवात केली, आता या ट्रोलिंगमध्ये ते ट्रोलिंग अपेक्षित नाही जे त्रास देण्यासाठी केलं जातं. हे ट्रोलिंग तर प्रेमापोटी केलं गेलं होतं. त्यातून उदयास आलं नवं इंटरनेट सेन्सेशन ज्ञानदा कदम…

काय सांगशील ज्ञानदा?

अँकर स्टुडिओत बसून बातम्या देत असताना रिपोर्टर लाईव्ह आला तर त्याला प्रश्न विचारण्याचं काम करतो, त्यावेळी तो त्याला सहाजिकपणे काय सांगशील?, असा प्रश्न विचारतो. हाच प्रश्न अनेकांच्या डोक्यात घर करुन बसला होता. जेव्हा ज्ञानदा कदमला प्रेमळ ट्रोलिंग सुरु करण्यात आलं तेव्हा सहाजिकपणे हाच प्रश्न विचारण्यात आला. काय सांगशील ज्ञानदा?

जिथं तिथं तुझी चर्चा गं, काय सांगशील ज्ञानदा गं?

लॉकडाऊनसोबत ज्ञानदा कदम चर्चेत आल्यानंतर जिथं तिथं तिचीच चर्चा पहायला मिळत होती. मग ते फेसबुक असो, इन्स्टाग्राम असो की टिकटॉक… ज्ञानदा कदमचा विषय नाही असा एकही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म नव्हता. ज्ञानदाच्या प्रेमापोटी काहीतरी यमक जुळवणं आणि त्याखाली काय सांगशील ज्ञानदा? असा प्रश्न हा साधारणतः प्रत्येका पॅटर्न बनला होता. हा धागा पकडून एबीपीनं एक कार्यक्रम देखील केला जाचं नाव होतं ‘काय सांगशील ज्ञानदा?’

ज्ञानदा तुम्हाला सांगतेय…

काय सांगशील ज्ञानदा?, असा प्रश्न सगळीकडे विचारला जात असताना एबीपीनं याच शिर्षकाखाली एक कार्यक्रम केला, ज्यामध्ये ज्ञानदा कदमने लॉकडाऊनचं गांभीर्य समजावून सांगितलं. काळजी घेण्यास सांगितलं. मास्क, रुमाल वापरायला सांगितलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शासनाच्या सूचनांचं पालन करायला सांगितलं. सोशल मीडियावर चाललेल्या प्रश्नाला ज्ञानदानं अचूक उत्तर दिलं होतं.

आता ज्ञानदावर आलंय चक्क गाणं-

सोशल मीडियावरील परिस्थितीचं अचूक आकलन असलेला गायक साजन ब्रेंदेनं ज्ञानदाचा ट्रेंड ओळखला नसता तरच नवल, आपल्या वैशिष्टपूर्ण लोकगीतांसाठी फेमस असलेल्या साजन ब्रेंदेनं या ट्रेंडवरही गाणं बनवण्याचा विचार केला आणि तो प्रत्यक्षातही आणून दाखवला.

जिथं तिथं तुझ्या नावाची चर्चा, समजू नको त्याला निंदा गं…
तुझ्यापुढे पोरीसुद्धा फिक्या, तुला पाहतोय तीनदा तीनदा गं…
किती गोड गोड बोलतीस ज्ञानदा गं, गोड गोड बोलतीस ज्ञानदा गं…

साजन बेंद्रेची गाणं म्हणजे सुपरहिट, त्यात त्याला आता ज्ञानदाचा टच मिळाला आहे त्यामुळे हे गाणं हिट ठरलं नाही तरच नवल…

गाणं पाहा-


Comments