सकाळची अपडेट : आज एक मृत्यू, 26 बाधित; एकूण बळी 84 तर बाधित 891

सोलापूर : आज रविवारी सकाळच्या सञात प्रशासनाकडून कोरोना अहवाल प्राप्त झाला असून यात एक मयत तर 26 बाधित रुग्णांचा समावेश आहे. सोलापूरमध्ये मृत्यूचा आकडा काही थांबता थांबेना, सकाळ असो की राञीचा अहवाल, त्यात मृत्यूची नोंद असल्याने नागरिकमध्ये भीती निर्माण झाली आहे. प्रशासनाने तसेच नागरिकांनीही कोरोनाबळीची शंभरी न गाठू देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.


आज सकाळी प्रशासनाकडून एकूण 79 जणाचा अहवाल प्राप्त झाला. यात एक मयत आणि 26 पॉझिटिव्ह रुग्ण आणि 53 निगेटिव्ह आढळले. आज झालेली मयत हा पुरुष असून याचा अधिक तपशील प्रशासनाकडून राञी प्राप्त होईल. आजच्या 26 बाधित रुग्णांमध्ये 13 पुरुष आणि 13 महिलांचा समावेश आहे. आज 26 ने वाढ झाल्याने सोलापुरातील एकूण बाधित रुग्णांची संख्या 891 वर पोचली आहे.


सोलापूर आजचा अहवाल
दि.31/05/20 सकाळी 8.00
आजचे तपासणी अहवाल - 79
पॉझिटिव्ह- 26 (पु. 13  स्त्रि- 13 )
निगेटिव्ह- 53
आजची मृत संख्या- 1 - 1पु
एकुण पॉझिटिव्ह- 891
एकुण निगेटिव्ह - 6224
एकुण चाचणी- 7115
एकुण मृत्यू- 84
एकुण बरे रूग्ण- 380

Comments