प्रेम प्रकरणाच्या वादातून एकास कुऱ्हाडीच्या दांडयाने मारहाण

मंगळवेढा: प्रेम प्रकरणावरून झालेला वाद व पाठवलेला मेसेज याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या संग्राम शिवाजी माने (रा.लवंगी) यास दगडाने व कु-हाडीच्या दांडयाने मारहाण करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी आकाश इंगवले,संगीता इंगवले,रोहित इंगळे (रा.खोमनाळ),अनिल लेंडवे या चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी हा कॉलेज शिक्षण घेत असताना एका कॉलेज युवतीबरोबर प्रेमसंबंध होते.यावेळी आरोपी आकाश इंगवले हा ही शिक्षण घेत होता. या दरम्यान आरोपी,फिर्यादी व सदर कॉलेज युवती या तीघांचे मैत्रीचे संबंध होते.दरम्यान आरोपी आकाश इंगवले याने फिर्यादीची प्रेमिका तथा कॉलेज तरुणी हिचे सोबत प्रेम संबंध निर्माण केल्याचे दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रेम संबंधाची कुणकूण फिर्यादीस लागली होती.

त्यामुळे मागील दोन दिवसापुर्वी आरोपी आकाश याने दुसऱ्याच्या मोबाईलवरून फिर्यादीच्या मोबाईलवर तुला दोनदा मारले आहे, मध्ये पडू नको असा मेसेज केला होता. दि.८ रोजी सकाळी ७.३० च्या दरम्यान फिर्यादीला जाब विचारण्यासाठी खोमनाळ येथे घरी गेला असता आरोपी आकाश इंगवले, संगीता इंगवले, रोहित इंगळे, अनिल लेंडवे आदीनी दगडाने, कुऱ्हाडीच्या दांडयाने मारून जखमी केल्याचे संग्राम माने याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.अधिक तपास पोलिस करीत आहेत.