विवाहितेची दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
मोहोळ : अज्ञात कारणाने एका विवाहितेने आपल्या दोन लहान मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना मोहोळ तालुक्यातील भोयरे गावच्या शिवारात १२ मे रोजी मध्यरात्री दोन ते पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान घडली. स्वाती कैलास साठे वय ३० वर्षे, अधिरा कैलास साठे वय २ वर्षे, अभिजीत कैलास साठे वय ८ वर्षे (सर्व रा. भोयरे ता. मोहोळ) अशी मृत माय लेकरांची नावे आहेत. या घटनेची नोंद मोहोळ पोलिसात करण्यात आली आहे.याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, भोयरे तालुका मोहोळ येथील साठे कुटुंबीय १२ मे रोजी जेवण करून झोपी गेले होते.
मध्यरात्री दोन वाजता कैलास साठे यांना जाग आली असता, पत्नी स्वाती मुलगा अभिजीत आणि लहान मुलगी अधिरा जागेवर नव्हते. त्यामुळे त्यांनी घराबाहेर येऊन अन्य नातेवाइकांच्या मदतीने त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला असता ते मिळून आले नाहीत. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास त्यांनी शेतातील विहिरीत डोकावून पाहिले असता लहान मुलगी अधिरा मृत अवस्थेमध्ये पाण्यावर तरंगत असल्यामुळे त्यांना धक्काच बसला.
घटनेची माहिती मिळताच मोहोळ चे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आशुतोष चव्हाण, बीट अंमलदार पोकळे यांनी घटनास्थळी धाव घेतली यावेळी स्थानिक नागरिकांच्या मदतीने अधिरा साठे आणि स्वाती साठे यांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले मात्र अभिजीत याचा मृतदेह पाण्यात आढळून आला नाही. त्यामुळे विद्युत मोटारीच्या साह्याने विहिरीतील पाणी बाहेर काढून अभिजीत चा मृतदेह शोधण्याचे काम पोलिस प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू आहे.
दरम्यान पोलिसांनी दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मोहोळच्या शासकीय रुग्णालयात पाठवून दिले. स्वाती साठे यांनी आपल्या दोन चिमुकल्यांसह आत्महत्या केली आहे का? कोणी त्यांचा काटा काढला हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलिसांच्या तपासाअंती या प्रकरणाचा उलगडा होणार आहे. या प्रकरणी मोहोळ पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अशुतोष चव्हाण हे करीत आहेत. या घटनेमुळे भोयरे सह संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
आर्थिक अडचणीचा सामना ..........
मयत स्वाती यांच्या सासऱ्याची काही महिन्यांपूर्वी महागडी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे महिनाभरापासून साठे कुटूंबिय आर्थिक अडचणीचा सामना करत असल्याने त्यांच्यात कौटुंबिक कलह मिर्माण झाले होते. यातूनच नैराश्य आल्याने स्वाती साठे यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा भोयरे गावात सुरु आहे. (दै. जनसत्य)