मोबाईलच्या कारणावरून मित्र झोपेत असताना डोक्यात दगड घालून केला खून
सांगोला: सांगोला शहरातील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मोबाईल घेण्याच्या कारणावरुन चिडून एकाने दुसऱ्याच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना घडली असून या घटनेनंतर आरोपी स्वतःहून पोलीस स्टेशनला हजर झाला. ही घटना आज बुधवार सकाळी सहाच्या सुमारास घडली. अण्णा मोहन साखरे (वय ३५) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.`
याबाबत पोलिससूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, मयत अण्णा साखरे व किरण कोळी हे दोघेही दिवसभर सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मिळून मोल मजुरीची कामे करतात.
दरम्यान, मंगळवार १९ मे २०२० रोजी रात्री दोघांनी मद्यप्राशन केले. यावेळी अण्णा साखरे याने किरण कोळीचा मोबाईल घेतला असता त्याने मोबाईल परत मागितला. यावेळी अण्णा साखरे याने त्याला ५०० रुपये दे नाहीतर काय करायचे ते कर असे म्हणाला. वाद झाल्यानंतर दोघेही मार्केट यार्डात झोपले पहाटेच्या सुमारास झोपेत असतानाच किरण कोळी यांनी अण्णा साखरेच्या डोक्यात दगड घातल्याने तो जागीच मयत झाला.
घटनेनंतर किरण कोळी पहाटे साडे सहाच्या च्या सुमारास स्वत:हून पोलीस स्टेशनला हजर झाला. याबाबत सांगोला पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.