सोलापूरची ‘गंभीर’ परिस्थिती पाहून IAS अधिकारी निरीक्षक म्हणून नियुक्ती

सोलापूर:-  सोलापूर येथे जिल्हाधिकारी यांच्या मदतीला आणखी एक आयएएस अधिकारी देण्यात आला आहे कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर पी. शिवशंकर यांची सोलापूरच्या निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सोलापूरात कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने ही नियुक्ती करण्यात आली आहे परवा जल संपदा मंत्री जयंत पाटील हे सोलापूर दौऱ्यावर असतांना सोलापूर ला कोरोनाचे संकट वाढत चालले आहे असे म्हणत सोलापूर साठी आणखी एक आयएएस अधिकारी दिला जाईल असे जाहीर केले होते यानंतर लगेच च पी. शिवशंकर यांची नियुक्ती करण्यात आली, संकर यांनी काल सोलापूर येथे हजर होऊन परिस्थिती चा आढावा घेतला.

सोलापूर शहर जिल्ह्यातील कोरोना विषाणूची बिघडत चाललेली परिस्थिती आणि वाढत असलेली रुग्णसंख्या याचा विचार करून काही दिवसापूर्वी सोलापुरात केंद्राचं चार जणांचे पथक येऊन गेलं त्याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोलापूरला आयएएस दर्जाचा नवीन अधिकारी नियंत्रणासाठी देणार असल्याचे सांगितले होते. त्याच पार्श्वभूमीवर राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी रविवारी कोरोनाची आढावा बैठक घेऊन सोलापूरला विशेष अधिकाऱ्यांची याची गरज नाही. मात्र, दिलाच तर तो या सर्वांपेक्षा सीनियर असेल अशी माहितीही दिली होती.

एकूणच या सर्व घडामोडीनंतर सोलापूर महापालिकेच्या आयुक्तपदी प्रविण गेडाम यांची नियुक्ती झाल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरल्या. तसे पाहिले तर प्रवीण गेडाम हे वरिष्ठ दर्जाचे अधिकारी आहेत आणि त्यांची महापालिका आयुक्तपदी बदली ही चुकीची बातमी फिरत आहे. दरम्यान सोमवारी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक पी. सिव. संकर यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते सायंकाळी साडेसहाच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात आले आहेत. शंकर हे आंध्र प्रदेश मधील हैद्राबादचे असून थेट आयएएस आहेत. यापूर्वी त्यांनी परभणीचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे. सध्या ते महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या एमडी पदावर काम पाहत आहेत.सोलापुरातील कोरोना बाधिताची संख्या आता 135 झाली आहे.तर मृतांची संख्या आठ वर पोहोचली आहे .

जिल्हा प्रशासनाने आज सोमवारी सायंकाळी 7 वाजता ही माहिती प्रसिद्ध केली आहे.आतापर्यंत मृतांची संख्या 8 झाली आहे. आजच्या अहवालात दोन जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. आत्तापर्यंत सोलापुरात 2258 जणांचे कोरोना साठी स्वॅब घेण्यात आले. यातील 2003 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात 1868 निगेटिव्ह तर 135 पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत.आज एका दिवसात 116 अहवाल प्राप्त झाले यात 109 निगेटिव्ह तर 7 पॉझिटिव्ह आहेत .

आज 2 पुरुष आणि 5 महिला यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यातील यात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. कालपर्यंत मृतांची संख्या 6 होती. यात दोनची भर पडली आहे. मृतात एक 65 वर्षीय महिला न्यू पाच्छा पेठ भागातील आहे; तर पाटकुल येथील 26 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ही महिला 24 रोजी दाखल झाली होती 26 एप्रिल रोजी तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. कोरोनातून बरे झालेले आणखीन तीन रुग्ण आज घरी सोडण्यात आले .