ट्रकच्या धडकेत मुलाचा मृत्यू, तर तीनजण जखमी
सांगोला (सोलापूर) : अज्ञात ट्रक चालकाने ट्रक चुकीच्या पद्धतीने चालवून दुचाकीस्वारास जोराची धडक दिली. यात सात वर्षीय मुलाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला आहे. अपघातात दुचाकीवरचे तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज (शनिवार) सकाळी सातच्या सुमारास सोनंद (ता. सांगोला) येथे घडली. शिवम भाऊसाहेब चव्हाण (वय सात, रा. बेळंकी, ता. जत, जि. सांगली) असे उपचारापूर्वी मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. भाऊसाहेब तुकाराम चव्हाण (वय 40), रूपाली भाऊसाहेब चव्हाण (वय 35) व ओम भाऊसाहेब चव्हाण (वय तीन, रा. बेळंकी) हे जखमी झाले आहेत.
अपघातानंतर ट्रकसह पसार
भाऊसाहेब तुकाराम चव्हाण (रा. बेळंकी, ता. जत, जि. सांगली) हे बेळंकीकडे (ता. जत) पत्नी व दोन मुलांसह जाताना वाटेत सोनंद चौक (ता. सांगोला) येथे जतकडून येणाऱ्या भरधाव अज्ञात ट्रकचालकाने चुकीच्या पद्धतीने स्प्लेंडर दुचाकीस जोराची धडक दिली. यामुळे दुचाकीवरचे शिवम चव्हाण, रूपाली चव्हाण, ओम चव्हाण गंभीर जखमी झाले. दरम्यान, अपघात झाल्यानंतर 108 ऍम्बुलन्समधून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेताना शिवम चव्हाणचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. तर रूपाली चव्हाण व ओम चव्हाण हे गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत सुदर्शन केशव चव्हाण यांनी ट्रकचालकाविरुद्ध पोलिसात फिर्याद दिली आहे. अपघात झाल्यानंतर ट्रक चालक ट्रक न थांबविता ट्रकसह पसार झाला.

Comments