सोलापूरच्या उपमहापौरला मदत करणे पडले महाग; उपनिरीक्षक निलंबित
सोलापूर : फसवणुकीच्या गुन्ह्यात ताब्यात घेतलेल्या सोलापूर महापालिकेच्या उपमहापौर राजेश काळे यांना पोलिसांनी सोडून दिले.या प्रकरणाची खातेअंतर्गत चौकशी करण्यात आली.पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी सांगवीच्या दोन अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.वरिष्ठ निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांना कंट्रोलला संलग्न करण्यात आले तर उपनिरीक्षक रविंद्र पन्हाळे यांना निलंबित करण्यात आले आहे.
सांगवी परिसरात एकच फ्लॅट अनेकांना विक्री करुन फसवणूक केल्याचा सोलापूर महापालिकेचे उपमहापौर राजेश काळे आणि त्यांच्या साथीदारांवर गुन्हा दाखल झाला आहे.या प्रकरणाचा तपास करताना सांगवी पोलिसांनी काळे यांना सोलापूर येथून ताब्यात घेतले.त्यांना सांगवी येथे आणले.दुस-याच दिवशी काळे यांना सांगवी पोलिसांनी काळे हे खोकत होते,थंडी,ताप असल्याचे सांगत होते,त्यामुळे त्यांना सोडण्यात आले.शिंका आणि खोकला येत असल्याने वैद्यकीय तपासणी करून नोटीस बजावत कोरोनाच्या भितीने सोडण्यात आले.त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेत खातेअंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली.स्वतःच्या कामात कसुरु केल्याचा ठपका लावत पोलीस आयुक्त बिष्णोई यांनी निरीक्षक साबळे यांना कंट्रोल ला सलग्न तर उपनिरीक्षक रविंद्र पन्हाळे यांना सेवेतून निलंबित केले आहे.

Comments