प्रियकराने धोका दिल्यामुळे युवतीची आत्महत्या
बार्शी : तालुक्यातील पिंपळगाव (दे) Pimpalgaon येथे लग्नाचे आमिष दाखवून दोन वर्षे प्रेमसंबंध (Two years of love affair showing the lure of marriage) ठेवल्यानंतर अचानक दुसऱ्या मुलीशी लग्न जमवून प्रियकराने धोका दिल्यामुळे निराश झालेल्या युवतीने विष पिवून आत्महत्या केली.
याप्रकरणी तिचा भाऊ श्रीकांत रावसाहेब सांगोलकर याने दिलेल्या फिर्यादीवरुन पांगरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पूजा रावसाहेब सांगोलकर असे आत्महत्या केलेल्या दुर्दैवी युवतीचे नाव आहे.पूजा हिचे गावातीलच रोहित रविंद्र देशमुख याच्या सोबत दोन वर्षापासून प्रेम संबंध होते.दोघांमध्ये मोबाईलवरुन सतत संभाषण होत असे. याबाबतची माहिती पुजाच्या घरी समजल्यानंतर त्यांनी दोघांनाही समजावून सांगितले होते. मात्र तरीही रोहित तिच्या मोबाईलवर सतत फोन करत असे.
त्यामुळे तिच्या कुटुंबियांनी आठ महिन्यांपूर्वी रोहितच्या वडिलांची भेट घेवून लग्नाचा प्रस्ताव मांडला असता घराचे बांधकाम झाले की लग्नाची बैठक बसवु असे आश्वासन त्यांनी दिले. परंतु दोन महिन्यांनी त्यांचे निधन झाले. त्यानंतर फिर्यादीने पुजासह रोहीत यास लग्नाबाबत विचारले असता त्यांने आई लग्नासाठी नको म्हणत आहे , आपण नंतर बघु असे उत्तर दिले. त्यानंतरही रोहित हा पुजाला अधूनमधून चोरुन भेटत होता. त्यानंतर गेल्या आठवड्यात रोहित याने पुजास तिच्याशी लग्न करणार नसल्याचे सांगितले.
शिवाय दुसऱ्या मुली सोबत लग्न जमवले. त्यानंतर फोन करुन तिला माझे दुसऱ्या मुलीशी लग्न जमले आहे तुला काय करायचे ते तु कर, आता तुझा माझा काहीही संबंध नाही, असे सांगितले. त्यामुळे मानसिक धक्का बसलेल्या पूजाने घरी कोणी नसतांना सकाळी साडेदहाच्या सुमारास विषारी औषध पिले. तिच्यावर उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला. रोहितने केलेल्या फसवणुकीचा जबर धक्का तिला बसला होता.

Comments