जिल्ह्यात आणखी ७ जणांना कोरोनाची लागण; एकूण बाधित ८०

सोलापूर - जिल्ह्यातील आणखी सात जणांना रविवारी कोरोनाची बाधा झाल्याचे वैद्यकीय अहवालात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह असलेल्या बाधितांची संख्या ८० वर पोहोचली आहे. तर अातापर्यंत एकूण 6 जणांचा मृत्यू झाला आहे.

माढ्यात वाढतोय कोरोना ; कुर्डूवाडीत 6 जण बाधित, 1 वळसंग मधील


आज एकूण ८० जणांचा अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ७३ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला तर सात जणांना कोरोची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. अाज रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या बाधितांची संख्या ० अाहे. इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन मधून सोडण्यात आलेल्या व्यक्तींची १६५ संख्या आहे. तर अातापर्यंत रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या बाधितांची संख्या ६ आहे. तर सक्रिय रुग्णांची ६८ संख्या आहे.

आरपीएफ ऑफिस कुर्डूवाडी तालुका माढा येथील ६ पुरुषांना कोरोनाची बाधा झाली आहे. वळसंग तालुका दक्षिण सोलापूर येथील एका पुरुषास सारीचा आजार झाला असल्याचे वैद्यकीय अहवालात निष्पन्न झाले.




Comments