पंढरपूर तालुक्यातील रांझणी येथे टेंम्पोची धडक देवुन तरूणाचा खुन
पंढरपूर तालुक्यातील रांझणी येथे टेंपोची धडक देऊन एका तरूणाचा खुन झाल्याची घटना गुरूवारी सायंकाळी साडे चार वाजता घडली आहे. रांझणी येथील सावकार उर्फ महादेव नारायण साळुंखे (वय 27) यांना टेंपोने धडक दिली यात त्यांचा मृत्यू झाला. मयताच्या कुटूंबियांनी हा अपघात नसून खून केल्याचा आरोप केल्याने पोलिसांनी याबाबत अधिक चौकशी केली.
याप्रकरणी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात बंडु उर्फ सुरज कांतीलाल दांडगे, दत्ता सुरवसे, योगेश चौगुले, दत्ता रामचंद्र पवार या चार आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, सावकार उर्फ महादेव नारायण साळुंखे हे पंढरपूरहून आपल्या गावाकडे परत येत असताना समोरून येत असलेल्या टेंपोने (क्र.एम. एच. 47 टी.3825) साळुंखे यांना धडक दिली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी डाॅ सागर कवडे, पो. नि. किरण अवचर यांनी दिली भेट दिली असुन टेंपो चालक बंडु उर्फ सुरज कांतीलाल दांडगे यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Comments