सोलापूर ग्रामीणच्या 1538 चाचण्यांमध्ये सापडले 107 कोरोना बाधित, पाच जणांचा मृत्यू
सोलापूर : सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रविवारी रात्री बारा वाजेपर्यंत कोरोना चाचण्यांचे 1 हजार 538 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 1 हजार 431 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 107 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. या रिपोर्टनुसार पाच जणांचा कोरोना मुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
आजच्या या रिपोर्टनुसार 107 जण एकाच दिवशी कोरोना मुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. ग्रामीण भागातील कोरोना बाधितांचा एकूण संख्या आता 31 हजार 262 झाली आहे. रुग्णालयात सध्या 1 हजार 707 जणांवर उपचार सुरू आहेत. 28 हजार 628 जण आतापर्यंत कोरोना मुक्त झाले आहेत.
कोरोनामुळे ग्रामीण भागातील 927 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे.
कोरोना चाचणीचे 48 अहवाल अद्यापही प्रलंबित आहेत. आजच्या अहवालामध्ये मृत दाखविण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये पंढरपुरातील डाळे गल्ली येथील 72 वर्षीय पुरुष, पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर येथील 68 वर्षीय महिला, मोहोळ तालुक्यातील कुरुल येथील 59 वर्षीय पुरुष, बार्शीतील शिवाजीनगर येथील 53 वर्षीय महिला आणि माढा तालुक्यातील केवड येथील 65 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
Comments